20 हजार महिलांची सामान्य प्रसुती करणारी आदर्शदायी

0

निजामपुर (ताहेर बेग मिर्झा)। साक्री तालुक्यातील पिंपळनेर गावातील 80 वर्षांच्या आजी वजिराखाला यांनी प्रसुती क्षेत्रात इतिहास निर्माण केला आहे. त्यांची ओळख पिपळनेर परिसरात सुमारे 20 हजार पेक्षा जास्त सामान्य प्रसुती करणारे खाला म्हणजे वजिराखाला. हात लावुन तपासल्या बरोबर त्यांना कळते की, पोटात जुळे आहे की बाळ ड़ोक्याकडुन आहे की पायाकड़ून. प्रसुती पीडा असह्य झाल्यावर महिलेचे नातेवाईक देवाकडे, प्रार्थना करत असतात. अशावेळी आवाज ऐकायला येतो वजिराखालाना बोलवुन आणा. त्या येताच सर्वांच्या जिवातजीव येतो. प्रसुती वेदनांनी पिडीत महिलेला वजिराखालाचा हात लागताच धोका टळून सामान्य प्रसुती होते.

वैद्यकीय तज्ञ घेतात मार्गदर्शन : सर्वांच्या चेहर्‍यांवरील चिंता क्षणात दुर करुन तिचे हास्यात रुपांतर करण्यार्‍या खाला देवदुतासमान भासतात. पिपळनेर येथे वजिराखाला म्हणूनच त्या सर्वत्र परिचित असुन त्याचाकड़े वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही पदवी नाही. मात्र वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ नसलेली अलाह की देन त्यांचाकडे आहे. अशाया खालाचे कार्य ही आजही अव्याह्यातपणे सुरू आहे. गेल्या 60 वर्षात तब्बल 20 हजाराहुन अधिक सामान्य प्रसुतीचे रेकॉर्ड त्याच्या नावे आहे. सर्व सामान्य गृहीणी म्हणुन त्या आजही घरात काम करीत असतात.

20 जून रोजी केली 80 वर्षे पूर्ण : वजिराखाला 20 तारीखेला 80 वर्ष पुर्ण केले आहे. त्यांचे माहेर जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील साकळी आहे. यागावी 20 जुन 1937 रोजी जन्म झाला आहे. त्यांचे लग्न पिपळनेर येथे झाले. त्यांचे सासरी आयुवैदाचे उत्तम ज्ञान होते. त्याचा वारसा वजिराखाला पुढे नेत आहे. त्या म्हणतात की अल्ला की महेरबानी से समाज कार्य मेरे हाथोसे हो रहा है। सामाजिक कार्यकर्त्यांना मला मार्गदर्शन करायचे असल्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

मोबदल्याची अपेक्षा नाही
रोज रात्री वजिराखाला यांना सामान्य प्रसुती करीता लोक मोटार सायकल, चारचाकी वाहन घेऊन नेण्यासाठी येतात. समाजाप्रती बांधिलकीच्या त्यांचा या कार्यासाठी समाजातील प्रत्येकी व्यक्ती गौरवाने त्यांच्याकडे पाहते. सुखरुप प्रसुती केल्या बदल त्यानां संबंधितांकडून कोणत्याही प्रकाराचे आथिर्क स्वरुपाची अपेक्षा नसते. त्यांच्या कार्यांची शासनाने दखल घेवून पदमश्री, पदमभुषण किंवा डॉ. आंबेडकर दलित मित्र किंवा महिला क्षेत्रात दिले जाणारे केंद्रीय, राज्यस्तरीय पुरस्कार देवून गौरविण्यात यावे अशी अपेक्षा नागरिक करीत आहेत.