जळगाव । केंद्र सरकारच्या नगर विकास मंत्रलयामार्फेत देशातील 500 शहरांची अमृत योजनेत निवड करण्यात आली आहे. त्या महाराष्ट्रातील 44 शहरांचीनिवड करण्यात आली असून त्यात जळगाव शहराचा समावेश आहे. संपूर्ण देशात 4 जानेवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान सर्व 500 शहरांची स्वच्छतेची तपासणी करण्यात येणार असून जळगाव शहराची तपासणी 20 ते 22 जानेवारी या कालावधीत होणार आहे. यासर्व 500 शहरांचे केंद्र सरकार मार्फेत स्वच्छतेचे मुल्यांकन केले जाणार आहे. हे मुल्यांकन एकूण 2000 गुणांचे आहे. यात 900 गुण हे स्वच्छतेच्या सद्यस्थितीबाबत महानगर पालिकेने दिलेली माहिती व पुरावांसाठी राखून ठेवण्यात आले आहेत. यामध्ये नागरिकांची व्यक्त केलेल्या मतांना गुण प्रदान करण्यात येणार आहे. 600 गुण हे नागरिकांचे मते व अभिप्रायांवर आहेत. उर्वरीत 500 गुण हे केंद्रिय पथकाच्या प्रत्यक्ष पाहणीवर दिले जाणार आहे.
अस्वच्छताविषयक तक्रारींसाठी अॅपची मदत
तपासणी पथक शहरात वैयक्तिक शौचालय बांधकामे, शहरातील स्वच्छता घंटागाडीचा वापर, रस्ते सफाई, उघड्यांवर शौचाला न जाणे व इतारांना जाऊ न देणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे, आपला परिसर स्वच्छ ठेवला आहे किंवा नाही याघटकांवर महानगर पालिकेचे गुणांकन अवलंबून आहे. नागरिकांना शहरातील स्वच्छतेच्या तक्रारींसाठी महानगर पालिकेद्वारा विविध स्वरूपात जनजागृती करण्यात येत आहे. यामध्ये खास फोन नंबर महापालिकेद्वारे चालविला जात आहे. स्वच्छतेच्या तक्रारी नागरिक 0257-2235210 या क्रमांकावर देवू शकतात. तसे गुगल प्ले स्टोअरमधून इएसबीएम जळगाव किंवा स्वच्छ एमओयूडी हे अॅप डाऊनलोड करून त्यांवरून तक्रारी नोंदविण्याची सुविधा महानगर पलिकेने उपलब्ध करून दिली आहे. यासोबचतच शौचालयांची माहिती मिळविण्यासाठी टॉयलेट लोकेटर अॅप डाऊनलोड करता येणार आहे. तरी शहरातील नागरिकांनी महानगर पालिकेतर्फे आयुक्त जीवन सोनवणे यांनी शहरातील नागरकिंनी स्वच्छता ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.