20 दिवसानंतर माल खरेदीस सुरुवात ; मात्र प्रशासक नियुक्तीनंतर पुन्हा बंद

0

शहादा । येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात गेल्या वीस दिवसापासून माल खरेदी विक्रीचा व्यवहार बंद होता. आज सकाळी व्यापार्‍यांनी माल खरेदी सुरु केली. सकाळपासून 40 ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये माल भरुन उभे होते. सुमारे तेराशे क्विंटल हरभर्‍याची आवक पहिल्या दिवशी होती. शेतकर्‍यांना योग्य भाव मिळाल्याचे समाधान आहे. मात्र समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने सहकार विभागाने सहाय्यक निबंधक सहकारी संस्था नीरव चौधरी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली असून आज सायंकाळी 6 वाजता त्यांनी कार्यभार स्वीकारला.लिलाव प्र्रक्रीया आज सुरू झाली. मात्र, उद्यापाासून ती अनिश्‍चित काळासाठी बंद राहणार आहे.

शेतकरी मेळाव्याची फलश्रृती
वारंवार कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व संचालक मंडळाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या प्रयत्नाना यश आले. यासाठी सातपुडा साखरकारखाना चेअरमन दिपक पाटील यांच्यासह नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, सभापती सुनिल पाटिल सह सर्व पक्षीय शेतकरी मेळावा घेण्यात आला .त्याची फलश्रृती आज पहावयास मिळाली. मेळाव्या नंतर बाजार समिती संचालक मंडळाचा बैठकीत व्यापार्‍याचे परवाने रद्द बादल ठरवित दि 25 एप्रिल पासुन बाजार सुरु होणार अशी घोषणा करण्यात आली होती.

इतर धान्याची आवक
कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील , व कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुनिल पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार आज सुमारे 40 ट्रॉली ट्रॅक्टर माल भरुन आला. 1300 ते 1500 क्विंटल हरभरा लिलावासाठी आला आहे. यात काही प्रमाणात सोयाबीन , मका व गहु देखील वेगळा होता. परवाने स्थगित केल्याने आठही व्यापार्‍यांनी लिलावासाठी हजेरी लावली. यात प्रकाश जैन , वर्धमान जैन , सुमतीलाल जैन , भटु अग्रवाल , अजय जैन सह व्यापारी होते.

शासनाने नवीन निवडणूक प्रक्रीया जाहीर केलेली नाही. मुदतवाढ दिलेली नाही. याही मुदत वाढीचा प्रस्ताव शासाकउे पाठविला आहे. मात्र, शेजारील तळोदा बाजार समितीला मुदतवाढ मिळाली, परंतु, शहाद्याला मिळालेली नाही. प्रशासक जरी कारभार बघणार असले तरी त्यांनी सर्वप्रथम शेतीकरी हिताला प्राधान्य द्यावे. लिलाव प्रक्रीया बंद
ठेवू नये.
– सुनील पाटील,
सभापती, तालुका बाजार समिती.

संचालक मंडळाची मुदत संपलयाने जिल्हा निबंधकांनी बाजार समितीवर प्रशासक नेमला आहे. समितीच्या सचिवांनी 8 व्यापार्‍यांचे परवाने रद्द केले. यावर व्यापार्‍यांनी अपिल दाखल केले आहे. यावरील निर्णय प्रलंबित आहे. व्यवहार सुरळीत होण्यासाठी एक निश्‍चित धोरण ठरविण्यात येईल. तसेच शासनाच्या पुढील आदेशानुसार निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत शेतकर्‍यांनी शेतमाल विक्रीस आणू नये.
– निरव चौधरी,
सहाय्यक निबंधक तथा प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती, शहादा