20 वर्षांनंतर पाकिस्तान सरकारात हिंदू दर्शनलाल झाले मंत्री

0

इस्लामाबाद: पाकिस्तानात गेल्या २५ वर्षात एकाही हिंदू नेत्याला मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही, हा इतिहास आहे. आता पहिल्यांदाच सिंध प्रांतातील डॉ. दर्शन लाल यांना नवे प्रधानमंत्री शाहिद अब्बासी यांनी मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून सहभागी गेले आहे.

नवाज शरीफ यांच्या मंत्रिमंडळात नसलेल्या सहा मंत्र्यांचा समावेश नव्या पंतप्रधानांनी केला आहे. त्यात लाल यांचा समावेश याहे. त्यांच्यावर खैबर पख्तूनख्वा, पंजाब, सिंध आणि बलुचिस्तान विभांगाचे समन्वय करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. २०१३ मध्ये लाल यांची पाकिस्तान मुस्लिम लिगच्या तिकिटावर संसदेत अल्पसंख्याक कोटामध्ये निवड झाली होती. पेशाने डॉक्टर असलेल्या ६५ वर्षीय लाल यांची निवड २०१६ मधील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन करण्यात आलेली आहे.