जळगाव। स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक गोपाल दर्जी यांना आज लाचलुचपत खात्याच्या पथकाने 2002 सालातील गुन्ह्यात अटक केली.
मुंबईच्या विशेष सत्र न्यायालयाने त्यांच्याविरोधात अजामिनपात्र अटक वॉरंट बजावले होते. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने गोपाल दर्जी यांना अटक करून जळगावातून मुंबईला नेले आहे. मुंबईत गोपाल दर्जींसह अन्य आरोपींच्या विरोधात 2002 सालात गु.र.नं.33/02, भा.दं.वि. कलम व लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यासह विद्यापीठ परीक्षा आणि अन्य विशेष परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध करणार्या कायद्यानुसार (1982) गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हा नोंदविल्यापासून गोपाल दर्जी न्यायालयात हजरच न झाल्याने त्यांच्याविरोधात 7 जुलै, 2017 रोजी न्यायालयाने अजामिनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. या वॉरंटची अंमलबजावणी जवळपास वर्षभरानंतर करीत त्यांना अटक केली.