खिर्डीतील वीज कंपनी कर्मचार्‍यांना सॅनिटायझरचे वाटप

0

खिर्डी : कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार व बारामती ऍग्रो यांच्या वतीने आलेले सॅनिटाझर जळगांव राष्ट्रवादी युवक जिल्हा कार्याध्यक्ष तथा पं.स सदस्य दीपक पाटील व स्वस्तिक ग्रुप खिर्डी खु.चे पदाधिकारी यांच्या मार्फत खिर्डी बु.॥ वीज वितरण कंपनीचे कर्मचारी तसेच ऐनपूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, नर्स व कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी सॅनिटायझर वाटप करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी तहसीलदार उषाराणी देवगुणे, ऐनपूर येथील डॉ.महाजन, डॉ. चौरे, वाघाडी येथील भागवत टिकाराम चौधरी, ललित पाटील, सतीश फेगडे, खिर्डी खु.॥ विविध कार्यकारी सोसायटी माजी चेअरमन राजू महाजन, मयुर इंगळे, गणेश बोरनारे, नईमभाई बेग, खिर्डी खुर्द माजी उपसरपंच अलताब भाई बेग, पत्रकार धुंदले उपस्थित होते.