2014 मध्ये आघाडी केली नसल्याचा परिणाम आता भोगतो आहे-सुनील तटकरे

0

मुंबई-२०१९ च्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. दरम्यान भाजप-सेनेत युती आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात आघाडी होईल का?याबाबत चर्चा सुरु आहे. दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी २०१४ मध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात आघाडी झाली नसल्याचा परिणाम आता भोगावे लागत असल्याची प्रामाणिक कबुली दिली आहे. मुंबईत एका कार्यक्रमात ते आज बोलत होते.

२०१४ मध्ये आघाडी केली असती तर आज जे सरकार सत्तेत आहे ते सत्तेत आले नसते. परंतू ठेच लागल्याशिवाय सुधारणा होत नाही असे तटकरे यांनी सांगितले. आघाडीच्या दिशेने दोन्ही पक्षात चर्चा सुरु असून लवकरच आघाडी होईल असेही तटकरे यांनी यावेळी सांगितले.