नवी दिल्ली । श्रीलंकेच्या फलंदाजांपुडे भारताचे गोलंदाज काहीसे फिके पडले आणि भारताला जबरदस्त पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे श्रीलंकेतील विजयाची प्रदीर्घ काळापासून चालत आलेली विजयी परंपरा खंडीत झाली. ही परंपरा खंडीत करण्याची नामुष्कीजनक कामगिरी टी-20 सामन्यासाठी श्रीलंका दौर्यावर असलेल्या भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर नोंदली गेली. श्रीलंकेच्या कुसाल परेराच्या धमाकेदार अर्धशतकी खेळी आणि श्रीलंकेच्या फलंदाजांसमोर भारताच्या गोलंदाजांची काहीशी फिकी कामगिरी यामुळे टी-20 सामन्यात भारताचा पराभव झाला. या पराभवामुळे शिखर धवनसारख्या एका चांगल्या खेळाडूची टी-20 कारकीर्दीतील चांगली खेळी वाया गेली. धवनने 49 चेंडूमध्ये तब्बल अर्धा डजन चौरा आणि तितकेच षटकार ठोकत 90 धावा केल्या. ही त्यांची अनेक उत्कृष्ट खेळीपैकी एक म्हणून ओळखली गेली.
भारतीय क्रिकेट संघाला निडास ट्रॉफीसाठी श्रीलंकेविरूद्ध सुरू असलेल्या मालिकेतील पहिलाच सामना भारताने गमावला. या पराभवाचे महत्वाचे कारण भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने प्रसारमाध्यमांसमोर सांगितले.रोहित शर्माने प्रसारमाध्यमांशी बोलताना पुढच्या सामन्यात भारतीय संघ दमदार पुनरागमन करेल असा आशावाद व्यक्त केला. पुढे बोलाताना रोहित म्हणाला, आमच्या खेळाडूंनी खूप चांगला प्रयत्न केला. पण, कधीकधी परिस्थिती आपल्या सोबत नसते. आम्ही जी रणनिती आखील ती फारशी प्रभावी ठरली नाही. आम्ही आमच्या चुकीमुळे पराभूत झालो. या काळात गोलंदाजी अधिक प्रभावी होणे गरजेचे आहे, असेही रोहित म्हणाला. दरम्यान, कोलंबोमध्ये भारतीय खेळाडूंकडे प्रदीर्घ अनुभव नसणे हे सुद्धा भारतीय संघाच्या पराभवाचे प्रमुख कारण आहे. आता असा दावा केला जाऊ शकतो की, संघातील सर्व खेळाडू हे आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले आहेत. त्यांच्याकडे अनुभव आहे. पण, काही असले तरी, आम्ही पुढच्या सामन्यात आम्ही आमची कामगिरी सुधारू, असेही रोहित शर्माने सांगितले.
2015 नंतर प्रथमच भारत श्रीलंकेत पराभूत
या पराभवाच्या रुपाने श्रीलंकेतील भारताच्या तब्बल अडीच वर्षांच्या विजयी परंपरेचे खंडन झाले. 2015 नंतर श्रीलंकेत भारतीय क्रिकेट संघ कधीच पराभूत झाला नव्हता. पण, 2018 मध्ये ही परंपरा खंडीत झाली. विशेष म्हणजे 2015 पासून भारत श्रीलंकेत झालेल्या काणत्याही प्रकारच्या क्रिकेट प्रकारातील सामन्यात भारताचा पराभव झाला नव्हता.