न्यूयॉर्कच्या मेटलाइफ स्टेडियममध्ये आईफा अॅवॉर्डच्या मुख्य कार्यक्रमाची चर्चा सुरूत्र सुरू आहे. यंदाच्या वर्षीचा हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध आईफा पुरस्कार सोहळा न्यूयॉर्कमध्ये आयोजित करण्यात आला. यात बॉलिवूडच्या प्रसिद्ध कलाकारांच्या हजेरीने कार्यक्रमांची रंगत आली. त्यामध्ये सर्वाधिक आकर्षक ठरली ती सोनाक्षी सिन्हा. तसेच नरगिस फाखरी आणि दिशा पटनी यांनीही लक्ष वेधून घेतले.
सोनाक्षीच्या ड्रेसमुळे तिचा ग्लॅमर लूक अधिक उठून दिसत होता. तिने साडी नेसली होती. सफेद रंगाची सोनेरी किनार असलेल्या साडीचा पदर मात्र विविध रंगांचा होता. ज्याच्या सोबत सोनाक्षीने ऑफ शोल्डरचा ब्लाऊज घातला होता. सोबत ए.आर. रेहमान यांनी आईफा रॉक्स कंसर्टमध्ये ऑस्कर आणि ग्रॅमी पुरस्कार विजेत्यांना त्यांच्या लोकप्रिय हिंदी आणि तामीळ भाषेतील गीतांवर चांगले थिरकायला लावले. आईफाच्या ग्रीन कार्पेटवर बॉलिवूड स्टार्सच्या धमाकेदार एन्ट्रीने अॅवॉर्ड नाईटमध्ये शाहीद कपूर आपल्या वेगळ्या स्टाईलमध्ये पत्नी मीरा राजपूतसोबत पोहोचला होता.