2018 ला दमदार पदार्पण करणार चेन्नई सुपरकिंग्स

0

चेन्नई । आयसीसी व बीसीसीआईचे पुर्व अध्यक्ष आणि आयपीएलच्या चेन्नई सुपरकिंग्स संघाचे मालक एन.श्रीनिवासन म्हणाले की,पुढील वर्षी त्यांचा संघ आयपीएलमध्ये दमदार प्रदापर्ण करेल.मद्रास एडवरटाइजिंग क्लबच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात म्हणाले की, 2018 मध्ये चेन्नई सुपरकिंग्स संघावरून प्रतिबन्ध दूर होईल. आणि संघाचे नेतृत्व महेंद्रसिंह धोनी सांभाळेल.2015 मध्ये मॅच फिक्सिंग मुळे राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्स या संघावर दोन वर्षाचा प्रतिबंध लावण्यात आला होता.

एन. श्रीनिवासन यांनी स्पष्ट केले
श्रीनिवासन म्हणाले की, महेंद्रसिंह धोनी पिवळी जर्सी घालून चेन्नई सुपरकिंग्साचे नेतृत्व करेल.2018 मध्ये दमदार प्रदापर्ण करणार आहे.चेन्नई सुपरकिंग्स या संघाला इंडिया सिमेन्टसने विकत घेतले होते.या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर व वाईस-प्रेसिडेंट श्रीनिवासन होते.2013 मध्ये सामना निश्‍चितीमुळे श्रीनिवासनचे जवाई गुरूनाथ मयप्पन याचे नाव समोर आल्याने संघाला दोन वर्षासाठी प्रतिबंध करण्यात आले होते.लोढा कमिटीने दिलेल्या अहवालानुसार चेन्नई व राजस्थान संघावर प्रतिबंध लावण्यात आला होता.त्यानंतर आयपीएलमध्ये दोन नविन संघ सहभागी करण्यात आले होते. राइजिंग पुणे सुपरजायंट व गुजरात लायंस यांचा सहभाग झाला होता.श्रीनिवासन या कार्यक्रमात सांगितले की, त्यांच्या कंपनीला चेन्नई सुपर किंग्स विकत घेण्याची सहमती तत्कालीन अध्यक्ष शरद पवार व आयपीएल अध्यक्ष ललित मोदी यांनी दिली होती.तामिळनाडू क्रिकेट असोशिएनचे अध्यक्ष श्रीनिवासन म्हणाले की तामिळनाडू प्रीमियर लीग यशस्वीता आहे की ज्यामुळे विजय हजारे ट्राफी व देवधर चषक यामध्ये दिसून आली.