2019 पर्यंत सिंचनाची टक्केवारी आश्‍चर्यजनक

0

मुंबई । सिंचनाची निश्‍चित टक्केवारी न सांगता राज्यामध्ये भाजप सरकार आल्यापासून सिंचन क्षमता वाढली असल्याचा दावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला. मंत्रालयात कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत महाजन बोलत होते. दोन वर्षांपूर्वी 16.1 सिंचन टक्केवारी होती आज काय स्थिती आहे? असा प्रश्‍न विचारला असता महाजन यांनी आताचा आकडा नाही, मात्र ज्यावेळी 2019 ला ज्यावेळी सरकार पाच वर्षे पूर्ण करेल त्यावेळी आश्‍चर्य व्यक्त लावणारा असेल आकडा येईल, असे गिरीश महाजन म्हणाले.

2 वर्षांत 5.30 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार
गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले की, राज्यात सर्व धरणात मिळून एकूण 75 टक्के पाणीसाठा आहे. हे पाणी शेतकर्‍यांना सिंचनाद्वारे मिळावे यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. 2 वर्षात 5.30 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असल्याचे महाजन यावेळी म्हणाले. सिंचनासाठी केंद्राकडूनही मदत मिळत असून प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेच्या अंतर्गत अनेक प्रकल्प पूर्ण होत आहेत. तसेच पैसे मोठ्या प्रमाणावर आले असल्याने कामे व्यवस्थीत सुरू आहेत, त्यामुळे टक्केवारी खूप वाढेल असे महाजन यावेळी म्हणाले. सिंचनाच्या टक्केवारीबद्दल विचारले असता अजित पवार, सुनील तटकरे यांच्याप्रमाणे टक्केवारीचा आकडा वेगवेगळा न सांगता एकच एकच आकडा येईल आणि तो चांगला असेल, असे गिरीश महाजन म्हणाले. कालवा सल्लागार समितीच्या अंतर्गत मंत्रालयात 36 प्रकल्पांच्या बैठका शुक्रवारी घेण्यात आल्या. या बैठकीनंतर बोलताना महाजन यांनी तीन वर्षात सिंचन क्षमता वाढल्याचे सांगत आगामी दोन ते तीन वर्षात 8 लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.