2019 मध्ये भाजपला रोखण्यासाठी लालुंचा फॉर्म्युला

0

नवी दिल्ली । 2019 शात 2019 मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींवर मात करण्यासाठी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी एक ‘फॉर्म्युला’ तयार केला आहे. उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि पंजाबमध्ये बिगरएनडीए पक्ष एकत्र आले तर 2019मध्ये भाजपला सत्तेपासून रोखता येईल, असे लालूप्रसाद यांनी म्हटले आहे. काँग्रेस देशातील प्रत्येक राज्यात पोहोचलेला पक्ष आहे.

बिहारमध्ये वाद नाही
बिहारमधील महायुतीत वाद असल्याच्या वृत्ताचेही त्यांनी खंडन केले. देशाला जातीयवादी पक्षांपासून वाचवण्यासाठी आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. देशाच्या पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन भाजपच्या विरोधात निवडणूक लढवली तर त्यांची दिल्लीतील खुर्ची हिसकावता येईल, असे लालूप्रसाद म्हणाले. भाजपला रोखण्यासाठी पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील भाजपतेर पक्ष एकत्र आले तर महायुती होऊ शकते. विखुरलेल्या विरोधकांचा भाजपला फायदा भाजपकडून पाकिस्तान, स्मशान आणि कब्रस्तानचे राजकारण केले जाते. देशाच्या जनतेचे यामुळे भले होणार नाही.

विरोधक विखुरलेले
विरोधी पक्ष विखुरलेले सल्यामुळे भाजप त्याचा फायदा उठवत आहे. मी ममता बॅनर्जींना पाठिंबा दिला आहे. मायावती यांना विरोधी पक्षाबरोबर असलेले आपले मतभेद दूर करण्यास सां गितले आहे. त्याचबरोबर समाजवादी पक्षाचे नेते पूर्वीपासूनच महायुतीत सहभागी होण्याच्या बाजूने आहेत, असे ते म्हणाले. लालू यांनी देशभरातील विरोधकांना एकत्र येण्याच्या दृष्टीने चर्चेला तोंड फोडले असलेतरी देशभरात विविध भागांचे प्रश्‍न आणि राष्ट्रीय प्रश्‍नांवरील विविध स्वरुपाच्या विरोधकांच्या भूमिकांमुळे त्यांना संयुक्त जाहीरनामा तयार करावा लागेल.

महाराष्ट्रातील मतभेदांचा मुद्दा
सर्वात मोठा पक्ष म्हणून सोनिया गांधींनी महायुतीसाठी पहिले पाऊल उचलले तर संपूर्ण भारत एकत्रित येईल आणि देशाच्या इतिहासात ही एक मोठी राजकीय घटना सिद्ध होईल, असेही ते म्हणाले. त्याचबरोबर महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेत असलेल्या मतभेदाचा फायदाही मिळेल, असे त्यांनी सांगितले. माओवाद, महागाई, केंद्राची धोरणे यामुळे जनमतही महायुतीच्या बाजूने होईल.