2019-20 मध्ये अफगाणिस्तान करणार भारताचा पहिला दौरा!

0

मुंबई । 2019-20 या वर्षामध्ये नवीनच टेस्टचा दर्जा प्राप्त झालेली टीम भारताचा दौरा करणार आहे. अफगाणिस्तानची टीम 2019-20मध्ये भारतात टेस्ट मॅच खेळेल, अशी माहिती बीसीसीआयनं दिली आहे. यंदाच्या वर्षी जूनमध्ये आयर्लंड आणि अफगाणिस्तानला आयसीसीनं टेस्टचा दर्जा दिला होता. टेस्ट मॅच खेळणारे हे 11वे आणि 12वे देश बनले होते.

2019मध्ये अफगाणिस्तानची टीम ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिली टेस्ट खेळणार होती, पण भारत-अफगाणिस्तानमधले ऐतिहासिक संबंध लक्षात घेता आम्ही पहिल्या टेस्टचं आयोजन केलं आहे, अशी प्रतिक्रिया बीसीसीआयनं दिली आहे. अफगाणिस्तान त्यांच्या घरगुती मॅच भारतामध्येच खेळतं. नुकतचं ग्रेटर नोयडामध्ये आयर्लंडविरोधात अफगाणिस्ताननं सीरिज खेळली होती. राशीद खान आणि मोहम्मद नबी या वर्षी आयपीएल लिलावामध्ये विक्री झालेले पहिले अफगाणिस्तानी खेळाडू ठरले होते.