VIDEO…२०१९ साठी भाजपचा नवीन नारा; ‘फिर एक बार मोदी सरकार’ !

0

नवी दिल्ली-लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष आतापासून तयारीला लागले आहे. जागावाटप तसेच इतर बाबींवर देखील विचार व्हायला लागले आहे. भाजपने बिहार सारख्या राज्यात जागा वाटप देखील निश्चित केली आहे. आता २०१९ च्या निवडणुकीसाठी भाजपने पुन्हा एकदा सत्ता मिळविण्यासाठी नवीन नारा दिला आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओच्या त्यांनी ‘फिर एक बार मोदी सरकार’चा नारा दिला आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी ‘अबकी बार मोदी सरकार हा नारा’ प्रसिद्ध झाला होता. घराघरात हा नारा पोहोचला होता. त्यामुळे मोदी लाट मोठ्या प्रमाणात होती. आता न्यू इंडियाचे स्वप्न दाखवणाऱ्या मोदींनाच पुन्हा निवडून द्या असे सांगत ‘फिर एक बार मोदी सरकार’ ही नवी घोषणा घेऊन भाजपा निवडणुकांसाठी सज्ज झाल्याचे अमित शाह यांनी स्पष्ट केले आहे.