मुंबई : २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणूकीकरता काँग्रेसने महायुतीची ब्लू प्रिट जाहीर केली आहे. काँग्रेस स्वातंत्र्यानंतर सर्वात मोठी लोकसभा निवडणूक २५० जागांकरता लढणार आहे. या मागचा उद्देश म्हणजे या महायुतीच्या माध्यमातून देशभरात पसरलेली मोदी लाट रोखणे हा आहे. काँग्रेस २०१४ मध्ये लोकसभेत जिंकलेल्या ४४ जागा कुणालाही देणार नाही.
बाकीच्या जागा महायुतीत घेणार असून २२४ जागांकडे लक्ष केंद्रीत करणार आहेत. यामध्ये मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरातचा देखील समावेश आहे. भाजपविरूद्ध काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे. याप्रकारे काँग्रेस जवळपास २५० जागांकरता रणनीति आखत आहेत.