2020 पर्यंत महाराष्ट्र व्यसन मुक्त झालाच पाहिजे

0

मुंबई : 2020 म्हणजेच महाराष्ट्र राज्याच्या हिरक महोत्सवी वर्षापर्यंत महाराष्ट्र व्यसन मुक्त झालाच पाहिजे असा एकच नारा आज आझाद मैदानात ऐकू आला. व्यसन मुक्त महाराष्ट्र समन्वय संघाने आझाद मैदानात महाराष्ट्र व्यसनमुक्त करण्याच्या मागणीसाठी 1 ऑगस्ट मंगळवारी राजव्यापी धरणे आंदोलन केले. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीला 2020 मध्ये 60 वर्षे पूर्ण होत असतांना म्हणजेच महाराष्ट्राच्या हिरक महोत्सवी वर्षापर्यंत व्यसन मुक्त महाराष्ट्र करावा असे उदिष्ट्य ठेऊन राजव्यापी व्यसन मुक्त महाराष्ट्र समन्वय मंच निर्माण करण्यात आला आहे. या मंचामध्ये राज्यभरातून सुमारे 99 संस्था, संघटना सहभागी झाल्या आहेत. व्यसनांच्या प्रश्नांवर प्रबोधन, उपचार, धोरण, कायदा या चारही आघाड्यांवर कार्यरत असणार्‍या संस्था, संघटना, व्यक्तींचा समावेश यात आहे. संघाच्या विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांकडे तसेच विधानसभा आणि विधानपरिषदेच्या आमदारांना व मंत्र्यांना पाठवण्यात आले आहे.

प्रमुख मागण्या
1 महाराष्ट्र शासनाने 7 जून 2017 रोजी शासनाने परिपत्रक क्र. बी पी ये 0417 प्र. क्र 71 (भाग 1) राउशु -2 हे तातडीने रद्द करावे
2 राज्य महामार्गावरील दारू दुकाने हटवण्याचा निर्णय कायम ठेवावा.
3 महाराष्ट्र शासनाने 2011 साली ठरवलेल्या व्यसन मुक्ती धोरणानुसार त्याच्या अंमलबजावणीतील अक्षम्य दिरंगाई दूर करून आवशयक ज्या राज्य जिल्हा तालुकानिहाय समित्यांच्या यंत्रणा त्वरित गठीत कराव्यात अतेच त्यातील इतर महत्वपूर्ण बाबींची कार्यवाही सुरु करावी

धार्मिक स्थळे व्यसनमुक्त करा!
राज्यातील सर्व धर्माची धार्मिक स्थळे व्यसनमुक्त करावे.सर्व प्रकारचे व्यसन अर्धक पदार्थ दारू, गुठका तंबाखू बिडी सिगारेट अफू चरस गांजा हेरोईन आदींवर बंदी व कारवाई विषयक कायद्यांची अमलबजावणी करावी.