यावल कला , वाणीज्य व विज्ञान महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरणावर २०२० प्रश्नमंजुषा स्पर्धा विद्यार्थ्यांच्या उपस्थित संपन्न
यावल (प्रतिनिधी ) येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाव्दारे संचलीत कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल येथे महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरणावर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शना खाली प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धमध्ये कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील अशा एकुण १२५ विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता.प्रश्न मंजुषा स्पर्धेसाठी यावल येथील महाविद्यालयातील उपप्राचार्य प्रा.ए पी पाटील,संजय पाटील,प्रा.एस. पी. कापडे,प्रा.पी.व्ही.पावरा,प्रा.राजु तडवी ,प्रा.संजिव कदम प्रा.डॉ.संतोष जाधव,प्रा.सुभाष कामडी,प्रा.सी टी वसावे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून प्रश्नमंजुषा स्पर्धचे यशस्वी नियोजन केले.