नवी दिल्ली : केंद्र सरकाचा थिंक टँक असलेल्या नीती आयोगाचे म्हणणे आहे की, 2022 पर्यंत भारतातील गरिबी, अस्वच्छता, भ्रष्टाचार, जाती-धर्मवाद आणि दहशतवाद नष्ट होणार आहे. नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी एका उच्चस्तरीय बैठकत न्यू इंडिया 2022 हा अहवाल सादर केला होता. या अहवालानुसार जर भारताचा विकास 2047 पर्यंत 8 टक्क्यांनी होत राहिला तर भारत जगातील तीन प्रमुख अर्थव्यवस्थांमधील एक देश होईल.
न्यू इंडिया 2022
न्यू इंडिया 2022 अहवालात असाही निष्कर्ष काढण्यात आला आहे की, 2022 पर्यंत भारत पुर्णपणे कुपोषणमुक्त होईल. तसेच दावा करण्यात आला आहे की, 2019 पर्यंत प्रधानमंत्री सडक योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक गाव जोडले जाईल. तसेच 2022 पर्यंत भारतात 20 पेक्षा जास्त जागतिक दर्जाच्या शिक्षणसंस्था असतील.
गावांना मॉडेल व्हिलेजचा दर्जा
या अहवालात म्हटले आहे की, पंतप्रधान आदर्श गाव योजनेंतर्गत येणार्या प्रत्येक गावाला मॉडेल व्हिलेजचा दर्जा दिला जाईल. विशेष म्हणजे, या अहवालात येत्या 2022 पर्यंत भारत गरिबीमुक्त देखील होईल, असे भाकित वर्तविण्यात आले आहे.