मुंबई-२०२२ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण होणार आहे. ७५ वर्ष पूर्ण होऊन देखील देशातील नागरिक स्वत:च्या घरापासून वंचित राहिला तर या स्वातंत्र्याला अर्थ राहणार नाही. याचा विचार करून राज्यातील प्रत्येक नागरिकांना स्वत:चे घर देण्याचे ध्येय शासनाचे आहे. २०२२ पर्यंत राज्यातील प्रत्येक नागरिकांकडे स्वत:चा घर असेल असा दावा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या ‘माझा व्हिजन’ या कार्यक्रमात ते बोलत होते. स्वत:चे घर तर असावेच परंतू शौचालय पण असावे हे ध्येय शासनाचे आहे असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. माजीमंत्री बाळासाहेब थोरात हे यावेळी उपस्थित होते. थोरात यांनी महसूलमंत्र्यांना प्रश्न केले.