2024 साली लॉस एंजेलिसला होणार ऑलिम्पिकचा ‘महाकुंभ’?

0

लॉस एंजिल्स । 2024 साली होणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपदासाठी चुरस निर्माण झाली आहे. या स्पर्धेचे यजमानपद मिळविण्यासाठी अनेक देश इच्छुक असल्याने स्पर्धा कुठे होणार? यावर शर्यत सुरु आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या प्रतिनिधी मंडळाचे येथे आगमन झाले. प्रत्येक चार वर्षांनी होणार्‍या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या यजमानपद शर्यतीमध्ये लॉस एंजिल्स आघाडीवर असल्याचे संकेत आहेत. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपदाची घोषणा येत्या सप्टेंबरमध्ये लिमा येथे केली जाईल.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे प्रतिनिधी मंडळ यजमानपदाच्या शर्यतीत इच्छुक असलेल्या शहरांना भेटी देणार आहेत. या समितीचा लॉस एंजिल्समध्ये तीन दिवस मुक्काम राहणार असून समिती सदस्य विविध ठिकाणी भेटी देऊन तेथील स्थितीची पाहणी करणार आहेत. यानंतर ही समिती पुढील आठवडयात पॅरिसमध्ये दाखल होणार आहे. या आगामी स्पर्धेच्या यजमानपद शर्यतीमध्ये लॉस एंजिल्स आणि पॅरिस या दोन शहरामध्ये अधिक चुरस आहे. या स्पर्धेच्या यजमानपदाची निवड मतदानाद्वारे 13 सप्टेंबर रोजी पेरूची राजधानी लिमा येथे होणार आहे.