पुणे मनपात अजित पवारांची दादागिरी चालणार नाही: जगदीश मुळीक

0

पुणे:पुणे शहरातील रस्ता

रुंदीकरणाचे काम अधिक चर्चेत आहे. मनपामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा असे चित्र पाहण्यास मिळत आहे. पुणे शहरातील 323 रस्ते 6 मीटरवरून 9 मीटर करण्याचा प्रस्ताव आला आहे. या बाबत पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नुकतीच विरोधी पक्षाच्या नगरसेवकांसोबत बैठक घेतली. या बैठकीत शहरातील सर्व रस्ते यामध्ये घेण्याच्या सूचना केल्या. यावर पुणे शहर भाजपाध्यक्ष जगदीश मुळीक यांनी अजित पवार यांना ‘दादा, तुमची पुणे मनपात दादागिरी चालनार नसल्याचे सांगितले आहे.

पालकमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांच्या बैठकीत सत्ताधारी भाजपाला इशारा देत बहुमताच्या जोरावर निर्णय घेऊ नये, अन्यथा राज्यसरकार म्हणून आम्ही लक्ष घालू अशा शब्दात सुनावले होते. यावर भाजपा शहराध्यक्ष मुळीक यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुणे शहरात भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना पाहायला मिळत आहे.

पुण्यातील जनतेने भाजपाला स्पष्ट बहुमत दिले असून जनतेच्या हिताचे आम्ही निर्णय घेत असल्याचे स्पष्ट केले आहे. आम्हाला रेटारेटी करण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.