धुळे जिल्ह्यात वॉर्डबॉयची 50 पदे रोजंदारी तत्वावर भरणार

0

धुळे: कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचा भाग म्हणून कोविड केअर सेंटर व कोविड हेल्थ सेंटर करीता वॉर्डबॉयची 50 पदे रोजंदारी तत्वावर कंत्राटी पध्दतीने भरतीसाठी मंजुरी मिळाली आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे यांनी सांगितले. वॉर्डबॉय पदासाठी शैक्षणिक अर्हता किमान दहावीची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्यात अनुभवास प्राधान्य देण्यात येणार आहे. अर्हताधारक उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षांदरम्यान असावे.

उमेदवारांनी ुुु.पहाुलवर्हीश्रशसारळश्र.लेा या ई- मेलवर 23 जून ते 25 जून 2020 रोजीच्या रात्री 11.59 वाजेपर्यंत पीडीएफ फॉर्मेटमध्ये अर्ज सादर करावा. अर्जासमवेत उमेदवाराने शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, दहावी उत्तीर्णचे गुणपत्रक व अनुभव प्रमाणपत्र सादर करावे. निवड झालेल्या उमेदवारांना 400 रुपये रोज मानधन देण्यात येईल, असेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सांगळे यांनी म्हटले आहे.