खंडाळ्यात दोन हजारांची गावठी दारू जप्त

0

भुसावळ : तालुक्यातील खंडाळा येथे गावठी दारूची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिसांनी कारवाई करीत मरीमाता मंदिरामागील शेतातून किशोर रमेश महाजन यास अटक केली. आरोपीच्या ताब्यातून एक हजार 800 रुपये किंमतीची 20 लीटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. ही कारवाई तालुक्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक निरीक्षक अमोल पवार, हवालदार नितीन सपकाळे, उमेश बारी आदींच्या पथकाने केली.