भुसावळ : संकल्प फाऊंडेशनतर्फे कोरोणाचा वाढत असलेला प्रभाव पाहता संकटाच्या काळात भुसावळ नगरपरीषदेचे सफाई कर्मचारी कोरोणा योध्दा म्हणून कार्यरत असून त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांना लागणार्या नित्याच्या घरघुती निर्जंतुकीकरणाच्या वस्तुचे वाटप गुरुवारी संकल्प फाऊंडेशनचे संस्थापक सदस्य व समाजसेवक संघदीप नरवाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आले. त्यात एन 95 मास्क व सॅनेटाईजर, घरातील फरशी निर्जंतुकीकरणाचे साहित्य देण्यात आले. युवराज नरवाडे, प्रा.प्रशांत नरवाडे, संघदीप नरवाडे, प्रशांत देवकर, शंकर चौधरी, अनिल चौधरी, अरुण दुधे, गणेश रणसिंगे, विजय मोरे, सोपान वाघोदे, नामदेव राणे, शे.फारुक आदी मित्र परीवार उपस्थित होता.