नंदुरबारमध्ये पुन्हा 5 जण कोरोना पॉझिटिव्ह !

0

नंदुरबार: शहरासह जिल्ह्यातील 5 व्यक्तिंचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर 24 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये शहरातील रेल्वे कॉलनी 36 वर्षीय पुरुष, नंदुरबार
पंचायत समिती -32 वर्षीय पुरुष ,नवापूर नवापूर येथील मंगलदास पार्क मधील -65 महिला, नंदुरबार शहरातील
देसाईपुरा भागातील 50 वर्षीय महिला, नंदुरबार तालुक्यातील  खोंडामळी येथील 50 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. यापैकी 4 व्यक्तिंवर पूर्वीच उपचार सुरू आहेत. तर  24 व्यक्तिंचा अहवाल निगेटीव्ह आला असल्याची माहिती देण्यात आली.