बोदवड : कोरोना रुग्णांची संख्या पाहता त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शहरात आठवड्यातून तीन दिवस जनता कर्फ्यू पाळण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे नगराध्यध्या मुमताज बी.बागवान यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवकांनी तहसीलदार हेमंत पाटील यांना निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोनाची साखळी तुटणे गरजेचे
निवेदनाचा आशय असा की, बोदवड नगरपंचायत क्षेत्रात कोविड 19 चामोठ्या प्रमाणात संसर्ग वाढत असून पॉझीटीव्ह रुग्णांच्या संख्येतही दिवसागणिक वाढ होत आहे. कोरोनाची साखळी तुटण्यासाठी आठवड्यातून तीन दिवस शुक्रवार, शनिवार, रविवार हे दिवस जनता कर्फ्यू म्हणून पाळण्यात यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार हेमंत पाटील यांच्याकडे करण्यात आली. निवेदन देताना नगराध्यक्षा मुमताज बी.बागवान, नगरसेवक सुनील बोरसे, देवेंद्र खेवलकर, दिनेश माळी, कैलास चौधरी, कैलास माळी, अकबर बेग, अस्मिन बी.शेख इरफान, नितीन चौहान, अनिल खंडेलवाल, डॉ.सुधीर पाटील, दीपक झमबाड, रेखा गायकवाड, सुशिलाबाई पाटील, वंदना पालवे, शकिना बी.कुरेशी, रुपाली राणे, सुशीलाबाई खाटीक व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या.