नंदुरबार मेडिकल कॉलेजसाठी 195 कोटींचा निधी मंजूर

0

नंदुरबार: मेडिकल कॉलेजसाठी लागणारी जागा टोकर तलाव रस्त्यावर उपलब्ध करून देण्यात आली असून मेडिकल कॉलेजच्या बांधकामासाठी केंद्र शासनाने 195 कोटी निधी मंजूर केला आहे, अशी माहिती खासदार हिना गावित यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आमदार

डॉ.विजयकुमार गावित हे देखील उपस्थित होते.
खासदार डॉ.हिना गावित म्हणाल्या की, नंदुरबार येथे मेडिकल कॉलेज मंजूर झाले असून या कॉलेजच्या बांधकामासाठी लागणारी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. टोकर तलाव रस्त्यावर 16 पॉईंट 63 हेक्‍टर जागा मिळाली आहे. मेडिकल कॉलेजसाठी एकूण 325 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, त्यापैकी 195 कोटी केंद्र सरकारने मंजूर केले आहे. नंदुरबार येथे मेडिकल कॉलेज झाल्यास आरोग्याचा प्रश्न सुटणार आहे. सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे आपल्याला यश आले असल्याचा दावा खासदार डॉ.हिना गावित यांनी पत्रकार परिषदेतून केला.