सावदा : सावदा नगरपरीषदेच्या उपनगराध्यक्षपदासाठी सोमवारी ऑनलाईन निवड प्रक्रिया पार पडली. विश्वास तुकाराम चौधरी यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्यने त्यांची सोमवारच्या विशेष सभेत बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. उपनगराध्यक्षा शबाना तडवी यांनी राजीनामा दिल्यानंतर निवडणूक जाहीर करण्यात आली होती तर सोमवारी विशेष ऑनलाईन सभा बोलावण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार उषाराणी देवगुणे व मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी काम पाहिले. मुख्याधिकारी दालनात ठरल्याप्रमाणे सकाळी 11 वाजता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. 11.30 वाजता नगरसेवक विश्वास चौधरी यांनी आपला उमेदवारी अर्ज मुख्याधिकारी सौरभ जोशी यांच्याकडे लेखी स्वरूपात दाखल केला. दुसरा कोणताही अर्ज दाखल न दाखल झाल्याने तहसीलदार यांनी विश्रास चौधरी यांची दुपारी 12 वाजता बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
नूतन पदाधिकार्यांवर शुभेच्छांचा वर्षाव
ऑनलाईन प्रक्रियेत सत्ताधारी गटाचे अजय भारंबे उपस्थित होते तर नगराध्यक्षा अनिता येवले यांच्यासह सर्व 10 नगरसेवकांनी व विरोधी गटाच्या चार नगरसेवकांनी ऑनलाईन प्रक्रियेत सहभागी होऊन उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणूक प्रक्रियेत सहभाग नोंदविला. उपनगराध्यक्षपदी विश्वास चौधरी निवड जाहीर झाल्यानंतर मुख्याधिकारी सौरभ जोशी, तहसीलदार उषाराणी देवगुणे, नगराध्यक्षा अनिता येवले, नगरसेवक अजय भारंबे यांच्यासह समर्थकांनी त्यांचे हारगुच्छ देऊन अभिनंदन केले.