पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर आज जाहीर झाला. राज्याचा निकाल ९०.६६ टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात ४.७८ टक्के वाढ झाली आहे. यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ९३.८८ टक्के तर मुलांचा निकाल ८८.०४ टक्के लागला आहे. राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९५.८९ टक्के तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी ८८.१८ टक्के लागला आहे. कला शाखेचा ८२.६३, वाणिज्य – ९१.२७, विज्ञान – ९६.९३, व्यवसायिक अभ्यासक्रम- ८६.०७ टक्के लागला आहे.
परीक्षेसाठी १४ लाख २० हजार ५७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. १४ लाख १३ हजार ६८७ विद्यार्थ्यांपैकी १२ लाख ८१ हजार ७१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
मंडळ निहाय निकाल
पुणे :९२. ५० टक्के
नागपूर : ९१.६५ टक्के
औरंगाबाद :८८ .१८ टक्के
मुंबई :८९ .३५ टक्के
कोल्हापूर :९२ .४२ टक्के
अमरावती :९२.०९ टक्के
नाशिक :८८ .८७ टक्के
लातूर : ८९. ७९ टक्के
कोकण : ९५ . ८९ टक्के