जिल्हाधिकार्‍यांकडूनही डॉ. उल्हास पाटील कोविड सेंटरची प्रशंसा

0

 

रूग्णालयातील अधिग्रहीत खाटा पुर्ण क्षमतेने वापरण्यावर विचार

जळगाव:कोरोनासाठी जिल्हा प्रशासनाने अधिग्रहीत केलेल्या डॉ. उल्हास पाटील कोविड केअर सेंटरला आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी भेट देऊन रूग्णांना मिळणार्‍या चांगल्या सुविधांविषयी त्यांनी प्रशंसा केली. दरम्यान रूग्णालयातील इतरही अधिग्रहीत खाटा पुर्ण क्षमतेने वापरण्याविषयी चर्चा करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.
जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यासोबतच रूग्णांना मिळणार्‍या आरोग्य सुविधांविषयीचा आढावा देखिल प्रशासनाकडून घेतला जात आहे. कोरोना बाधित, संशयित रूग्णांना कोविड सेंटर आणि क्वारंटाईन सेंटरमध्ये आवश्यक त्या सुविधा देण्याचा प्रशासनाकडुन प्रयत्न सुरू आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातील ४०० खाटा कोविडसाठी अधिग्रहीत केल्या आहेत. याठिकाणी जवळपास २५० कोरोना बाधित रूग्ण उपचार घेत आहे. रूग्णालयातील सुविधा, उत्साहवर्धक वातावरण आणि विश्वास या बळावर आत्तापर्यंत याठिकाणी अनेक रूग्ण कोरोनामुक्त होऊन आपापल्या घरी सुखरूप परतले आहे.

जिल्हाधिकार्‍यांनी घेतला आढावा
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आज पुन्हा डॉ. उल्हास पाटील कोविड केअर सेंटरला भेट दिली. यावेळी नोडल अधिकारी गोरक्ष गाडीलकर हे देखिल उपस्थित होते. यासंदर्भात माहिती घेतली असता जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले की, डॉ. उल्हास पाटील कोविड सेंटरला रूग्णांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. याठिकाणी रूग्णांना चांगल्या सुविधा मिळत असल्याने रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. त्यामुळे अधिग्रहीत केलेल्या संपूण खाटांचा वापर करण्याचा विचार केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांनी रूग्णालयाचे चेअरमन माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्याशी चर्चाही केली. यावेळी डॉ. वैभव पाटील, डॉ. केतकी पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, प्रशासन अधिकारी आशिष भिरूड, एन.जी. चौधरी आदी उपस्थित होते.