जळगाव: जिल्ह्यात आज नव्याने 244 कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली आहे. एकूण रुग्णसंख्या 8849 झाली आहे. सर्वाधिक 43 कोरोबाधाीत रुग्ण हे एरंडोल तालुक्यात आढळून आले. दिवसभरात 13 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हयात कोरोनाचा कहर सुरुच आहेत. यात जिल्ह्यात बुधवारी नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 42, जळगाव ग्रामीण 9, भुसावळ 14, अमळनेर 8, चोपडा 7, पाचोरा 2, भडगाव 15, धरणगाव 3, यावल 22, एरंडोल 43, जामनेर 21, रावेर 12, पारोळा 16, चाळीसगाव 12, मुक्ताईनगर 9, बोदवड 7 व इतर जिल्ह्यातील 2 अशी रूग्ण संख्या आहे. यात जळगाव शहरातील 6, एरंडोल, यावल तालुक्यातील प्रत्येकी 2, रावेर, पाचोरा व जामनेर तालुक्यात प्रत्येकी 1 याप्रमाणे 13 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.