रशियाने मारली बाजी; कोरोनाची पहिली लस विकसित

0

मास्को: कोरोनावर आजपर्यंत लस विकसित करण्यात यश आलेले नव्हते. संपूर्ण जगात कोरोनाची लस बनविण्याबाबत स्पर्धा सुरु होती. आजपर्यंत अनेक देशांनी कोरोनाची लस बनविल्याचा दावा केला. मात्र कोणत्याही देशाने ती लस विकसित केली नव्हती. मात्र यात रशियाने बाजी मारली असून आज मंगळवारी ११ ऑगस्टला कोरोनाची लस लॉंच केली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी याबाबत माहिती दिली आहे. स्वत: राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांच्या मुलीवर कोरोना लसीचे प्रयोग करण्यात आले.

रशियातील गमलेया या संशोधन संस्थेने ही लस विकसित केली आहे. रशियाचे आरोग्य मंत्री मिखाईल मुराश्को यांनी लसीची चाचणी यशस्वी झाली आहे. लवकरच लसीचे उत्पादन सुरु करण्यात येईल आणि ती बाजारात उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगितले आहे.

राष्ट्राध्यक्ष यांच्या मुलीवर लसची चाचणी करण्यात आली. त्यात पहिल्या दिवशी ताप ३८ सेल्सिअसपर्यंत होते, दुसऱ्या दिवशी ते ३७ वर आले असे सांगण्यात आले आहे.