नंदुरबार। भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रकने सुशोभिकरणासाठी बसविण्यात आलेली रोटरी क्लबची पृथ्वी उध्वस्त केल्याची घटना शुक्रवारी 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरासमोर घडली. ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाला आहे.
शहरातील धुळे चौफुली कडून एक खाली ट्रक येत होता, ब्रेक फेल झाल्याने चालकाचा ताबा सुटला, लोकांना वाचवण्यासाठी ट्रक चालकाने थेट रोटरी क्लबची पृथ्वीला धडक दिली,त्यामुळे सुशोभित करणासाठी असलेली पृथ्वीची प्रतिकृती पार उध्वस्त झाली आहे, शिवाजी महाराज नाट्यमंदिराजवळ सायंकाळी ही घटना घडली आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ असते, मात्र चालकाच्या समय सुचकतेमुळे हा अनर्थ टळला. दरम्यान याच ट्रकने चौपाळे रस्त्यावर असलेल्या के,आर,पब्लिक स्कुल जवळ एक अपघात केला आहे,त्यामुळे पोलीस या ट्रकला पोलीस ठाण्यात जमा करण्यासाठी घेऊन जात होते,मात्र मोठा मंदिर पासून ट्रकचा ब्रेक निकामी झाला त्यामुळे हा अपघात घडल्याचे सांगण्यात आले.