जळगाव: जामनेर येथे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून ग्लोबल महाराष्ट्र हॉस्पिटल उभे राहिले आहे. आज या रुग्णालयाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलतांना फडणवीस यांनी गिरीश महाजन यांचे कौतुक केले. जळगाव जिल्हा आणि जामनेर तालुक्यातील एकही रुग्ण पैसा नाही म्हणून उपचारापासून वंचित राहणार नाही. जिल्ह्यातील जनतेसाठी गिरीश महाजन यांचे हे मोठे काम आहे असे गौरवोद्गार फडणवीस यांनी काढले.
राजकीय क्षेत्रात गिरीश महाजन यांनी खूप काम केले आहे. जलसंपदा मंत्री असतांना सिंचनाचे मोठे काम त्यांनी केले मात्र त्याहीपेक्षा आरोग्य क्षेत्रातील त्यांचे काम मोठे आहे असे फडणवीस यांनी सांगितले.