खडसेंच्या सदस्यत्वाचा राजीनामा नाहीच: चंद्रकांत पाटील

0

पक्षांतराचे सिमोल्लंघन मात्र विजयादशमीआधीच

जळगाव: भाजपाचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरून मोठी चर्चा सुरू आहे. सोशल मीडीयात रोज खडसेंबाबत वेगवेगळे वृत्त व्हायरल होत आहे. आज देखिल खडसेंनी भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची चर्चा होती. मात्र यासंदर्भात ‘दै. जनशक्ति’ने थेट भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता असा कुठलाही सदस्यत्वाचा राजीनामा खडसेंनी दिला नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान असे असले तरी विजयादशमी आधीच खडसेंच्या पक्षांतराचे सिमोल्लंघन होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.