विशेष पोलीस महानिरिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली चार जिल्ह्यांचे पथकांची एकत्रित कामगिरी
रावेर/ जळगाव :- संपूर्ण महाराष्ट्र राज्याला हादरविणार्या रावेर तालुक्यातील बोरखेडा हत्याकांडाप्रकरणी जिल्हा पोलीस दलासह विविध जिल्ह्याच्या चार पथकांच्या
एकत्रित मेहनतीने 6 दिवसात पोलिसांनी संशयित निष्पन्न करुन त्यास अटक केली आहे. महेंद्र सिताराम बारेला वय 19 रा केर्हाळा. ता रावेर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे आहे. विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षकांसह यांच्या 70 कर्मचार्यांच्या दिवसरात्र मेहनतीतून गुन्ह्याचा छडा लावण्यासह आरोपीला अटक करण्यात यश आले.
विशेष पोलीस महानिरिक्षक तळ ठोकून
बोरखेडा येथे 16 ऑक्टोंबर रोजी 13 वर्षाची मुलगी, 11 वर्षाचा मुलगा, 8 वर्षाच्या मुलगा व 6 वर्षाची मुलगी या चौघांची कुर्हाडीने निघृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली होती. यातील 13 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले होते. व त्यातून हे हत्याकांड घडल्याचे समोर आले होते. त्यानुसार याप्रकरणी संशयितांविरोधात रावेर पोलीस स्टेशनला भा.द.वि.क .302 , प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर तपासा दरम्यान 376 (अ ) , 452 , लैगिंक अपराधापासुन बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4,6,8,10,12 अन्वये कलमान्वये वाढ करण्यात आलेली आहे . घटना घडल्यापासून स्वतः विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. प्रताप दिघावकर, पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे हे घटनास्थळी तळ ठोकून आहेत.
विशेष पोलीस महानिरिक्षकही
विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. प्रताप दिघावकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी तसेच नाशिक परिक्षेत्रातील नाशिक ग्रामीण, धुळे व नंदुरबार येथील कर्मचार्यांची पथके, तसेच पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक बापू रोहम, स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण चे पोलीस निरिक्षक के.के.पाटील, पोलीस निरिक्षक रामदास वाकडे, सहाय्यक पोलीस निरिक्षक शितलकुमार नाईक, स्वप्निल नाईक, पोलीस उपनिरिक्षक मनोज वाघमारे, पोलीस उपनिरिक्षक सुधाकर लहारे, पोलीस उपनिरिक्षक अंगद नेमाणे, पोलीस उपनिरिक्षक रोहिदास ठोंकरे, नंदुरबार येथील पोलीस निरिक्षक योगेश राऊत, धुळे येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक उमेश बोरसे, राजेंद्र पवार, योगेश शिंदे, अशाप्रकारे एकूण 70 पोलीस कर्मचार्यांची यंत्रणा गुन्ह्याचा उलगडा करण्यासह संशयितांच्या शोधार्थ कामाला लागली होती.
शवविच्छेदन अहवालासह पुराव्यांचा आधार
चार मुलांच्या गळयावर धारदार शस्त्राने गंभीर जखमा करून हत्या करण्यात आली होती. यावेळी घटनास्थळा वरुन एक लाकडी दांडा असलेली कु -हाड जप्त करण्यात आली होती. या गुन्ह्यात 54 जणांची सखोल चौकशी करण्यात आली. यात गुन्हयात मयताच्या शवविच्छेदन अहवाल, सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा नाशिक यांच्याकडून प्राप्त अहवाल, शास्त्रीय पुरावे घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे कर्मचार्यांनी हे हत्याकांड हे महेंद्र सिताराम बारेला वय 20 केर्हाळे ता.रावेर याने केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार 22 रोजी त्यास अटक करण्यात आली. या गुन्ह्यात इतर संशयितांची चौकशी सुरु सुरु असून पुढील तपास पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा हे करीत आहेत.