आशादायक: कोरोनाच्या रुग्ण संख्येत प्रचंड मोठी घट

0

नवी दिल्ली: कोरोनामुळे चिंतेचे वातावरण असले तरी आता काहीशी सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे. जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा जोर आता कमी कमी होतांना दिसत आहे. भारतातील कोरोना वाढीचा दर आता कमी होतांना दिसत आहे. भारतातील कोरोनाबाधितांच्या संख्या ८० लाखांच्या जवळ पोहोचली आहे. जगाच्या तुलनेत भारत दुसऱ्या स्थानी आहे. मात्र भारतातील रिकव्हरी रेट जगापेक्षा अधिक आहे. कोरोनाबाधितांची संख्या मोठी असली तरी आता मात्र कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड मोठी घट झाली आहे. सोमवारी २६ ऑक्टोंबर रोजी आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार मागील 24 तासांत देशभरात कोरोनाचे 45,149 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 480 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 79,09,960 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,19,014 पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 6,53,717 रुग्ण सध्या अॅक्टीव्ह आहेत. तर 71,37,229 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

भारतातील रिकव्हरी रेट ९० टक्क्याच्या वर गेला आहे. इतर देशांच्या तुलनेत हे अधिक आहे. दुसरीकडे देशातील अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या ८.२६ टक्क्यावर आली आहे. देशातील मृत्यूदरही कमी झाला आहे. सध्या १.५० टक्के मृत्यूदर आहे.