21 कोटीच्या पाणीपुरवठा योजनेचे जलपुजन

0

शिंदखेडा। शहरात गेल्या 30 वर्षांपासून केवळ पाण्यावर राजकारण सुरू होते अनेकवेळा पाणी पुरवठा योजनेच्या नावाने बॅनर झळकले, फटाके फुटले पण ते फटाके केवळ फुसके होते मी शहराचा पाणीप्रश्‍न सोडविण्याचे वचन दिले होते ते आज पूर्ण केल्याचे समाधान आहे, आज पासून शिंदखेडा शहराला 15 नव्हे तर केवळ 3 दिवसाआड पाणी येईल असा विश्‍वास राज्याचे रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी केले. पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या 21 कोटीच्या पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. योजनेचे जलपूजन ना.रावल यांच्या हस्ते करण्यात आले.

यांची लाभली उपस्थिती
यावेळी जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, नगराध्यक्षा रजनी वानखेडे, उपनगराध्यक्ष प्रकाश देसले, कामराज निकम, अनिल वानखेडे, तहसीलदार सुदाम महाजन, मुख्याधिकारी अजित निकत, सुभाष माळी, युवराज माळी, भिला पाटील, वंदना गिरासे, योगिता पाटील, नर्मदा भिल, अशोक देसले, निर्मला माळी, नगरसेवक किसन सकट, भारती जाधव, राहुल कचवे, संगिता थोरात, मीरा पाटील, राजेंद्र देसले, किरण चौधरी, गोविंद मराठे, दीपक चौधरी, भूषण कौठळकर, अरुण देसले,निलेश पाटील, दीपक अहीरे, सुनील चौधरी, उदय देसले, सुरज देसले आदी मान्यवर उपस्थित होते.