21 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा

0

नरडाणा। भगवान एकलव्य आदिवासी सेवा संस्थेतर्फे नरडाणा-पिंप्राड येथील गोरक्षनाथ मंदिर- एकलव्य धाम येथे जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या21 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला. यावेळी विवाह सोहळ्यातील वधु-वर पक्षाकडून चार हजार रुपये शुल्क आकारून त्यांना लग्नविधीचे कपडे, जेवणावळी, मोठा मंडप, तीन ते चार डिजे, घोड्याऐवजी नवरदेवांना कार अशा पध्दतीने दोघा पक्षांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

8 हजार नागरिकांची उपस्थिती
या विवाह सोहळ्यात सात ते आठ हजार समाजबांधव उपस्थित होते. त्यामुळे नरडाणा गाव ते गोरक्षनाथ टेकडी परिसराला यात्रेचे स्वरूप आलेले होते. या विवाहसोहळ्याच्या यशस्वीतेसाठी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रेवबा बागूल, भगवान मोरे, न्हानू अहिरे, श्याम मालचे, किशोर महाले, सुनील बागूल, भाईदास ठाकरे, गुलाब मालचे, भीमराव मोरे हे दोन महिन्यांपासून जिल्ह्यात जनजागृती करीत होते. यापूर्वीही ट्रस्टच्यावतीने आदिवासी गोरगरीब कुटुंबांना संसोरोपयोगी खाद्य सामुग्री वाटप, दरमहा आर्थिक बचत करणे, तसेच विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत.