गोल्ड कोस्ट : 21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या ६९ किलो वजनी गटात वेटलिफ्टींगमध्ये पुनम यादवने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. पुनमने ही आश्वासक कामगिरी रविवारी सकाळी झालेल्या पहिल्या क्रीडा प्रकारात दमदार कामगिरी केली आहे. त्यानंतर काही मिनिटांमध्ये १० मी. एअर पिस्तुल प्रकारात भारताच्या नेमबाजांनी आपल्या पदकांचे खाते उघडले आहे . मनु भाकेर आणि हिना सिद्धु यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदकाची कमाई केली.
भारताने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या चौथ्या दिवशी लागोपाठ पदकांची कमाई केली आहे. महिलांच्या 69 किलो वजनी गटात वेटलिफ्टर पूनम यादवने हिने सुवर्णमयी कामगिरी बजावली. पूनम यादवने 222 किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळविले. नेमबाजीतही मनू भाकरेनी सुवर्ण कामगिरी केली केली आहे. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत 9 पदकांची कामाई केली आहे. यात 6 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्यपदकाचा समावेश आहे.