21 जानेवारी रोजी धर्मजागृती सभा

0

नंदुरबार । येथील जुने पोलीस ग्राऊंड, नेहरू पुतळ्याजवळ 21 जानेवारी 2018 रोजी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेच्या प्रचाराचा शुभारंभ सनातन संस्थेचे संत सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या शुभहस्ते माळीवाडा येथील नंदूरबारचे ग्रामदैवत श्री योगेश्‍वरीदेवीच्या चरणी श्रीफळ वाढवून करण्यात आला.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राज्य प्रवक्ते अरविंद पानसरे, समन्वयक डॉ.नरेंद्र पाटील, जितेंद्र राजपूत, वसंत पाटील, आकाश गावीत, सनातन संस्थेच्या भावना कदम आणि भारती पंडित उपस्थित होत्या. 21 जानेवारी रोजी होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेसाठी आमदार गोरक्षक राजासिंह ठाकूर, नंदकुमार जाधव, रागेश्री देशपांडे, क्षिप्रा जुवेकर म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.