जळगाव : 21 व्या शतकातील पालकत्व या विषयावर मुंबईचे सुप्रसिद्ध मानासोपचार तज्ज्ञ डॉ. हरिश शेट्टी यांचे रविवारी 11 डिसेंबर रोजी मोफत व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी पाच वाजता कांताई सभागृहात हे व्याख्यन होणार आहे. जळगावातील सायकियाट्रिक सोसायटीतर्फे हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. आयोजकांनी पत्रकार परिषदेत गुरूवारी ही माहिती दिली.
पालकांसमोर अनेक समस्या
पालकत्व ही आज सुईच्या टोकावरची कसरत झाली आहे. पालकवर्ग सुशिक्षित, चाणाक्ष व बदल करायला तयार आहे. मात्र, समस्यांचा डोंगर उंच उंचच होत चालला आहे. मुलांमधील वाढत जाणारा हट्टीपणा, आत्महत्या, व्यसनाधिनता, एकलकोंडेपणा, उदासिनता, आत्मकेंद्री वृत्ती हे सर्व काळजी उत्पन्न करतात. पालक म्हणून आपल मुल आनंदी व सुखी, समाधानी असावे अशी अपेक्षा असते. सर्व पालकांची काहीशी स्थिती अभिमन्यू सारखी झाली आहे. चक्रव्युहात जाण्याचा मार्ग तर माहित आहे पण बाहेर कसे पडावे हे ठाऊक नाही. पालकत्व 21 व्या शतकात बदलणे आवश्यक आहे व ते बदल झाल्याने पाल्यांचे संगोपन नक्कीच व्यवस्थित होईल व हे आदर्श पालकत्व पुढ्चा पिढीपर्यंत जाईल, त्या पार्श्वभूमीवर डॉ. शेट्टी यांचे व्याख्यान मोलाचे ठरेल अशी माहिती जळगाव सायकियाट्रिक सोसायटीतेर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली असून पालकांनी या संधीचा लाभ घ्यावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पत्रकार परिषदेला अध्यक्ष डॉ. किर्ती देशमुख, सचिव डॉ. सतिश पाटील, उपाध्यक्ष डॉ. उल्हास बेंडाळे, डॉ. दिलीप महाजन, डॉ. प्रदीप जोशी, डॉ. प्रकाश चित्ते, डॉ. मयुर मुथे, डॉ. विजयश्री मुथे, डॉ. पंकज संघवी, डॉ. उदय बेंडाळे यांनी पत्रकार