लव्ह जिहादला हिंदू जागरण मंचचे प्रत्युत्तर
नवी दिल्ली : देशात लव्ह जिहादचा मुद्दा चर्चेत असतानाच हिंदू जागरण मंचाने लव्ह जिहाद संदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. हिंदू जागरणच्यावतीने पुढील वर्षात त्यांचे 2100 हिंदू कार्यकर्ते मुस्लीम मुलींशी लग्न करतील, असे म्हटले आहे. हे कार्यकर्ते मुस्लीम समाजातील मुलींशी लग्न करून हिंदू रितीरिवाजांनुसार राहतील. या मोहिमेंतर्गत 2100 मुस्लीम मुलींना हिंदू बनविण्यात येईल. ज्या मुली हिंदू धर्म स्विकारतील त्यांच्या देखभालीची जबाबदारी हिंदू जागरण मंच करेल; असे हिंदू जागरण बहू बेटी आयामच्या प्रदेशाध्यक्ष अज्जू चौहान यांनी सांगितले.
‘लव्ह जिहाद’चे आव्हान
केरळमधील कथित लव्ह जिहाद प्रकरणांमुळे लव्ह जिहाद प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. काही दिवसांपूर्वी या प्रकरणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात हदियाला हजर करण्यात आले होते. अखिला अशोकन नाव बदलून हदिया झाली होती. या प्रकरणात तिने न्यायाधीशांना सांगितले की, मला स्वातंत्र्य पाहिजे. माझा नवरा माझी काळजी घेण्यास समर्थ आहे. मी त्याच्यासोबत राहून माझे शिक्षण सुरू ठेवू इच्छिते. या प्रकरणाची पुढील सुनावणी जानेवारी 2018मध्ये होणार आहे. दरम्यान, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनीही मुस्लीम मुलींशी लग्न करणार असल्याचे जाहीर केले आहे.
लव्ह जिहाद म्हणजे काय?
लव्ह जिहाद हा शब्द दोन शब्दांचा मिळून होतो. इंग्रजी भाषेतील शब्द लव्ह म्हणजे प्रेम आणि अरबी भाषेतील शब्द जिहाद. ज्याचा अर्थ होतो की कोणत्या तरी उद्देश ठेवून काम करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणे. म्हणजेच जेव्हा एका विशिष्ट धर्माला मानणारे लोकं दुसर्या धर्मातील मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्या मुलीला धर्म बदलण्यासाठी प्रवृत्त करतात. या पूर्ण प्रक्रियेस लव्ह जिहाद म्हणतात.