दिलासादायक: देशातील अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या ७ टक्क्यांच्या खाली

0

नवी दिल्ली: देशातील करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली असली इतर देशांमध्ये दुसरी लाट आल्याने भारतातही ती येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या ८२ लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मागील २४ तासांत देशात ४६ हजार ९६३ नवीन करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर ४७० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील बाधितांची संख्या ८१ लाख ८४ हजार ८२ इतकी झाली आहे.

विशेष म्हणजे भारतातील रिकव्हरी रेट जगाच्या तुलनेत मोठी आहे. देशात आतापर्यंत ७४ लाख ९१ हजार ५१३ (९१.५४ %) जणांनी करोनावर मात केली आहे. सध्या पाच लाख ७० हजार ४५८ रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या ६.९७ टक्के आहे. देशातील एकूण करोनाबळींची संख्या एक लाख २२ हजार १११, (१.४९%) इतकी झाली आहे.

महाराष्ट्रात मागील २४ तासांत ५,५४८ रुग्णांची नोंद झाली, तर ७,३०३ जण करोनामुक्त झाले. गेल्या २४ तासांत ७४ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण १५ लाख १० हजार ३५३ बाधित बरे होऊन घरी परतले. सध्या २५ लाख ३७ हजार ५९९ व्यक्ती गृहविलगीकरणात, तर १२ हजार ३४२ रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.