ईडीकडून तीनदा समन्स, तरीही सेना आमदार सरनाईक गैरहजर

0

मुंबई: आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या दोन्ही मुलांच्या घरी, कार्यालयात ईडी (अंमलबजावणी संचालनालय)डून छापेमारी करण्यात आली. त्यावेळी आमदार प्रताप सरनाईक हे परदेशात होते, त्यामुळे त्यांची चौकशी झालेली नाही. दरम्यान ते मुंबईत परतले आहेत. ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलविले आहे. यासाठी तीनवेळा समन्स देखील बजावले आहे. मात्र अद्यापही आमदार सरनाईक आणि त्यांचे पुत्र विहंग ईडी समोर हजर झालेले नाही. त्यामुळे आता ईडी काय पाऊले उचलणार याकडे लक्ष लागले आहे. पुढील महिन्यात हजर राहण्याची परवानगी आमदार सरनाईक यांनी मागितली आहे.

ईडी केंद्र सरकारच्या हाताचे बाहुले आहे असा आरोप होऊ लागला आहे. जाणीवपूर्वक भाजपकडून विरोधी पक्षाच्या नेत्यांना धमकाविले जाते असल्याचेही आरोप होते.