नंदूरबार: उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली

0

नंदुरबार: चार दिवस उलटून देखील तोडगा न निघाल्याने उपोषणाला बसलेल्या चारही जणांची प्रकृती खालावली आहे. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे देखील या उपोषणकर्त्यांनी अन्न त्याग आंदोलन सुरू केले आहे. शहरातील पिसाळलेल्या कुत्रांनी चावा घेतल्यामुळे मृत झालेल्या बालिकेच्या तसेच कुत्रांच्या झुंडीत अपघात होऊन जीव गमावलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना नगरपालिकेने नुकसान भरपाई द्यावी, तसेच मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा या मागणीसाठी डॉ नरेंद्र तांबोळी, मयूर चौधरी, मुकेश माळी, मोहित राजपूत या तरुणांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.

प्रकृती खालावल्याने आमरण उपोषणकर्ते नरेंद्र पाटील, मयुर चौधरी यांना पोलीस प्रशासन आणि शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती यांनी विनंती करून किमान पाणी सुरू करण्याची विनंती केली तुमचा चारही जणांचा जीव महत्वाचा आहे असे म्हणून पुढील उपचार जिल्हा रुग्णालयात घ्यावा अशी विनंती केल्याने पाणी घेऊन जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. उपचार झाल्यावर पुन्हा नगर परिषद समोर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल.