किनगाव अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत

0

मुंबई : जळगाव जिल्ह्यातील किनगाव (ता. यावल) येथे पपई घेऊन जाणाऱा टेम्पो पलटी होऊन त्यात १५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. दरम्यान मृत मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाखांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जाहीर करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली आहे. सर्व मृत मजूर हे रावेर तालुक्यातील रहिवाशी आहेत. मृतांमध्ये सहा महिला व नऊ पुरूष आहेत. या घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. अपघातात जखमी झालेल्या मजुरांवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. संबंधित अपघातग्रस्तांना सर्व ती आवश्यक मदत करण्याचे निर्देश दिले.