शेवटची महासभा: शिवसेनेकडून भाजपच्या महापौरांचा सन्मान

जळगावः शहराचे महापौर भारती सोनवणे यांचा महापौरपदाचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. आज शुक्रवारी होणारी महानगरपालिकेची महासभा ही त्यांच्या कार्यकाळातील शेवटची महासभा आहे. दरम्यान महासभेला सुरुवात होण्यापूर्वी शिवसेनेकडून महापौरांचे ढोलतांशाच्या गजरात स्वागत करण्यात येऊन निरोप देण्यात आला. महापौर पदावर असतांना शहराच्या विकासासाठी चांगली कामगिरी केल्याची भावना देखील यावेळी व्यक्त करण्यात आली. माजी महापौर नितीन लढ्ढा, नगरसेवक कैलास सोनवणे, नगरसेवक नितीन बरडे, गणेश चौधरी, आदी यावेळी उपस्थित होते.