संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या ‘या’ चार राज्यांच्या निवडणुकीची आज घोषणा

नवी दिल्ली : पश्‍चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम हे चार राज्य आणि पुदुच्चेरी या एक केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होण्याची शक्यता आहे. केद्रीय निवडणूक आयोगाने आज शुक्रवारी दुपारी 4.30 वाजता पत्रकार परिषद बोलविली असून यात ते निवडणुकीची घोषणा करण्याची शक्यता आहे. पाचही राज्यांच्या मतगणना एकाच दिवशी पार पडेल. में 2021 पूर्वी निवडणूक प्रक्रिया पुर्ण होईल असे बोलले जात आहे.

पश्चिम बंगालच्या निवडणुकीकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागले आहे. देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने यासाठी अधिक कंबर कसली आहे. मागील दोन वर्षापासून भाजप पश्‍चिम बंगालमध्ये जोरदार तयारीला लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांनी पश्‍चिम बंगालकडे लक्ष केंद्रीत केले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पुढे सत्ता टिकविण्याचे मोठे आव्हान आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक घेणे हे निवडणूक आयोगासाठी जिकीरीचे काम आहे. मोठे आव्हान देखील आहे. करोना प्रोटोकॉल पाळून निवडणुका घेता येऊ शकतात, असंही निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी कोरोना काळातच बिहारच्या निवडणूका घेण्यात आल्या होत्या.