अनुसूचित जातीसाठी १०६३५ रुपये असे एकूण १३३१० कोटी रुपये निधी
अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी इयत्ता सहावी पासून प्रत्येक जिल्ह्यातील एका निवासी शाळेत सीबीएसई शाळा सुरू करून पथदर्शी प्रकल्प राबविणार
•तृतीयपंथीयांच्या स्वावलंबन व विकासासाठी स्वतंत्र बीजभांडवल योजनेची घोषणा
स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार महामंडळासाठी प्रत्येक साखर कारखान्यास एकूण गाळपावर प्रतिटन १० रू. सेस लागणार, यातून जेवढी रक्कम जमा होईल तेवढीच रक्कम राज्य शासन देणार
• दिव्यांगत्वाचे २१ प्रकार व त्यानुसार दिव्यांग व्यक्तींसाठीच्या विविध योजना एका क्लिकवर मिळाव्यात यासाठी अद्ययावत मोबाईल/वेब अँपची निर्मिती
• डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) च्या सर्व योजना व एकूण कार्यक्रमासाठी १५० कोटी रुपये
*अर्थ संकल्पात बीड जिल्हा*
• भगवानगड, नारायणगड, गहीनीनाथ गडाच्या विकासासाठी भरीव निधी देणार
• परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र विकासासाठी विशेष निधी उपलब्ध करून देणार
• माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथील प्राचीन मंदिराच्या जीर्णोद्धार व तीर्थक्षेत्र विकासासाठी भरीव निधी